नाशिक : तपोवन परिसरात राज्य सरकारने कुंभमेळ्याच्या तयारीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड सुरू केल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) याविरोधात आवाज उठवला आहे. पर्यावरण संवर्धनाचा मुद्दा उपस्थित करत मनसेतर्फे नागरिकांचा मतप्रवाह जाणून घेण्यासाठी आणि आंदोलनाला जनसमर्थन मिळवण्यासाठी ऑनलाइन स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आली आहे.
यासाठी विशेष गूगल फॉर्मद्वारे सहभाग नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पर्यावरणप्रेमी, स्थानिक नागरिक तसेच सामाजिक संघटनांनी या मोहिमेत सहभागी होऊन तपोवन परिसराबाबतची चिंता व्यक्त करावी, असे आवाहन मनसेने केले आहे.
📌 स्वाक्षरी मोहिमेसाठी लिंक:
https://forms.gle/yBahNSjpAc2Ut3ak6
#MNSAdhikrut
