दिवा \ आरती परब: टोरट पॉवर आणि महावितरणने शिळ येथील अरिहंत कार्यालयात विशेष ग्राहक सेवा शिबिराचे आयोजन केले होते. या ग्राहक सेवा शिबिराला ग्राहकांकडून खूप सकारात्मक प्रतिसाद मिळाला, दोन्ही ठिकाणी एकत्रितपणे ७०० हून अधिक ग्राहकांनी उपस्थिती नोंदविली.
प्रमुख प्रश्न हे महावितरणच्या मागील प्रलंबित थकबाकीशी संबंधित होते, जिथे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ग्राहकांना अंशतः देयके (part-payment) भरण्याची सुविधा करून दिली. टोरेंटच्या अधिकाऱ्यांनी बिलिंग आणि व्हिजिलन्सच्या समस्यांबाबत ग्राहकांना मार्गदर्शन केले व डिजिटल पेमेंट सेवा, वीज सुरक्षा, ऊर्जा संवर्धन टिप्स, वीज चोरीबद्दल जागरूकता, नवीन वीज दर आणि बरेच यासारख्या विषयांवर ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची संधी साधली.
या विशेष ग्राहक सेवा शिबिराला महावितरणचे वरिष्ठ अधिकारी तसेच टोरंट पॉवरचे उपाध्यक्ष - जीवन क्लर्क, महाव्यवस्थापक - अंकित साहा, राघवेंद्र राव, विजय राणे, संपदा जायंट आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ग्राहकांनी या शिबिराला अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला, महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत असे शिबिरे नियमितपणे आयोजित करण्याची विनंती केली आणि उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत विविध विषयांवर चर्चा करण्याची संधी घेतली.

