टोरंट पॉवरकडून शीळ- मुंब्रा- कळवा येथे भव्य रक्तदान शिबिर


थॅलेसेमिया रुग्णांसाठी तब्बल ३६५ रक्ताच्या बाटल्यांचे संकलन

दिवा \ आरती परब  : समाज आरोग्य आणि कल्याणासाठी सातत्याने उपक्रम राबवणाऱ्या टोरट पॉवर कंपनीतर्फे शनिवारी भिवंडी तसेच शीळ- मुंब्रा- कळवा (SMK) परिसरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. कंपनीच्या समुदाय सेवा उपक्रमांतर्गत आयोजित या शिबिराचा उद्देश थॅलेसेमिया रुग्णांसाठी आवश्यक रक्तसंकलन करणे हा होता.


कंपनीच्या विविध विभागांमधील कर्मचाऱ्यांनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदवत या शिबिरात एका दिवसात तब्बल ३६५ रक्ताच्या बाटल्या संकलित करण्यात आल्या. संकलित रक्त भागीदार रक्तपेढ्यांकडे सुपूर्द करण्यात आले असून ते थॅलेसेमिया तसेच इतर गंभीर रुग्णांच्या उपचारांसाठी उपयुक्त ठरणार आहे.



या सामाजिक उपक्रमाला कर्मचाऱ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. “अशा उपक्रमात सहभागी होताना आम्हाला समाधान मिळते. समाजोपयोगी कार्यक्रम राबवणाऱ्या संस्थेचा भाग असल्याचा अभिमान आहे,” असे अनेक कर्मचाऱ्यांनी सांगितले.


टोरंट पॉवरच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले, “टोरंट पॉवर ही केवळ विजपुरवठा करणारी संस्था नाही; तर समाजहितासाठी कार्य करण्यास आम्ही तितक्याच निष्ठेने वचनबद्ध आहोत. थॅलेसेमिया रुग्णांसाठी आयोजित या शिबिराला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद प्रेरणादायी आहे.”


टोरंट पॉवर वर्षभरात आरोग्य, शिक्षण, पर्यावरण आणि समाजविकासाशी संबंधित विविध उपक्रम राबवते. समाजावर सकारात्मक आणि शाश्वत परिणाम घडवण्याच्या उद्दिष्ट्याने कंपनी सातत्याने कार्यरत आहे.




Post a Comment

Previous Post Next Post