भाजपच्या कचरा फेको आंदोलनाला दिव्यात मोठे यश



प्रशासनाला जाग, घंटा गाडी पूर्ववत सुरू;  कचऱ्याचे ढीग कमी

दिवा \ आरती परब : दिव्यात गेल्या काही दिवसांपासून वाढत चाललेल्या कचराकोंडी विरोधात भारतीय जनता पार्टी, दिवा शहर तर्फे राबविण्यात आलेल्या ‘कचरा फेको’ आंदोलनाला अखेर मोठे यश मिळाले आहे. आंदोलनानंतर प्रशासनाला जाग आली असून आजपासून संपूर्ण दिव्यात घंटा गाडीची सेवा पूर्ववत सुरू करण्यात आली आहे. परिणामी शहरातील अनेक ठिकाणी साचलेले कचऱ्याचे ढीग कमी होऊ लागले असून नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.



सततच्या पाठपुराव्यानंतरही दिवा प्रभागातील कचरा उचलण्याची कामे ठप्प असल्याने भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा मार्ग पत्करला होता. या आंदोलनानंतर प्रशासनाने तातडीने लक्ष देत घंटा गाडी नियमित करण्याचे आश्वासन दिले आणि प्रत्यक्षात गाड्या पुन्हा मार्गावर धावताना दिसत आहेत.




तथापि, कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न पुन्हा गंभीर झाला तर दिवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांच्या दालनातच कचरा नेऊन टाकण्यात येईल, असा कडक शब्दात इशारा भारतीय जनता पार्टी, दिवा शहर तर्फे प्रशासनाला देण्यात आला आहे. या इशाऱ्याची प्रशासनाने गंभीर नोंद घ्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.





Post a Comment

Previous Post Next Post