मुलुंड-भांडुप विभाग युवतीसेना विभागाध्यक्षपदी समिक्षा स्वप्नील पवार


मुंबई : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशिर्वादाने, तसेच शिवसेना मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश परिषा प्रताप सरनाईक, युवासेना मुख्य सचिव राहुल लोंढे आणि युवासेना सचिव किरण साळी यांच्या विनंतीनुसार, समिक्षा स्वप्नील पवार यांची शिवसेना युवतीसेना विभागाध्यक्ष (मुलुंड-भांडुप) पदी नियुक्ती करण्यात आली आहे.


या नियुक्तीनंतर समिक्षा पवार यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, “ईशान्य मुंबई युवासेना अध्यक्ष श्री. गुरज्योत सिंग आणि  आमदार अशोक दादा पाटील यांनी माझ्यावर एवढी मोठी जबाबदारी दिली आहे, याबद्दल मी त्यांची मनःपूर्वक आभारी आहे. त्यांच्या या विश्वासाला तडा न जाऊ देता मी माझी जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडण्याचे आश्वासन देते. आपल्या सर्वांच्या प्रेम आणि पाठिंब्याने शिवसेना आणि युवतीसेनेची विचारधारा अधिक बळकट करण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन,” असे त्या म्हणाल्या.

या नियुक्तीमुळे मुलुंड-भांडुप परिसरातील युवतीसेनेच्या संघटनात्मक कार्याला नवी ऊर्जा मिळेल, असा विश्वास स्थानिक पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.




Tags : #Shivsena #YuvaSena #EknathShinde #DrSrikantShinde #MaharashtraDaura #Election2025




Post a Comment

Previous Post Next Post