दिवा \ आरती परब : कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुका मधील रावारी गावाचा सुपुत्र आणि भारतीय पॉवरलिफ्टिंग संघाचा कर्णधार कुमार सुशांत सोनू आगरे याने खडतर परिस्थितीवर मात करत अतुलनीय मेहनतीच्या जोरावर जगाला आपली ताकद दाखवली आणि भारतासाठी सुवर्ण पदक मिळवून देण्याचे मोलाचे काम केले आहे.
श्रीलंका (कोलंबो) येथे २७ ते ३० नोव्हेंबर २०२५ दरम्यान झालेल्या वर्ल्ड पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये १२ देशांच्या स्पर्धकांमध्ये ६९ किलो वजनी गटात तब्बल २२२ किलो वजन उचलून भारताच्या नावावर सुवर्ण पदक पटकावण्याची उत्तम कामगिरी केली. रावारी गावाचा अभिमान, गावच्या मातीत आणि सामान्य शेतकऱ्याच्या घरी जन्म, लांजा तालुका – रत्नागिरी जिल्हा येथील साधं आयुष्य, गावी शिक्षण पूर्ण करून मुंबईत दिवा साबेगाव येथे भाड्याच्या खोलीत राहून नोकरीसोबत पॉवरलिफ्टिंग मध्ये सातत्य ठेऊन, मेहनत आणि जिद्दीने सहभाग घेतला. त्या मेहनतीचं फळ आज जागतिक पातळीवर सुवर्ण यशात रूपांतर झाले आहे. तसेच हे यश मेहनत, शिस्त, जिद्द आणि असामान्य क्षमतेचे प्रतीक आहे.
आज त्याची दिवा शहरातील शिवसेनेच्या वरीष्ठ नेत्यांनी त्याची घरी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या तेव्हा उपस्थित शिवसेना दिवा शहरप्रमुख/ माजी उपमहापौर रमाकांत मढवी, माजी नगरसेवक शैलेश पाटील, माजी नगरसेवक दिपक जाधव, उपशहर प्रमुख आदेश भगत, विभागप्रमुख उमेश भगत, स्थानिक विभाग प्रमुख निलेश पाटील, विभागप्रमुख गुरुनाथ पाटील व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
