अजित एकनाथ भगत यांचा आरपीआय (आठवले गट) मध्ये प्रवेश
दिवा \ आरती परब : दिवा विभागातील राजकारणाला मोठी कलाटणी देणारी घडामोड म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि जनसामान्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय असलेले अजित एकनाथ भगत यांनी आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) – आठवले गटात अधिकृतरित्या प्रवेश केला.
अजित भगत यांच्या प्रवेशामुळे दिव्यातील आरपीआय (आठवले गट) ला मोठे बळ मिळाले असून पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळत आहे. तळागाळातील प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणारे आणि नागरिकांशी थेट संपर्कात राहणारे नेते पक्षात दाखल झाल्याने आगामी निवडणुकांमध्ये पक्षाची ताकद वाढणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
यानिमित्त दिवा शहरात लवकरच शेकडो कार्यकर्त्याचा अजित भगत यांच्या उपस्थितीत भव्यदिव्य पक्षप्रवेश सोहळा आयोजित केला जाणार आहे. दिनेश पाटील आणि अजित भगत हे ओबीसी समाजातील प्रभावी चेहरे असल्याने आरपीआयला याचा नक्कीच मोठा राजकीय फायदा होणार, असे मत सौरव आढांगळे यांनी व्यक्त केले.
अजित भगत यांच्या पक्षप्रवेशामुळे दिवा विभागात नवीन राजकीय समीकरणांची शक्यता निर्माण होत असून, कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले आहे.
