प्रभाग क्रमांक २९ मधून शंकर पाटील यांच्या पत्नीचा अर्ज दाखल

 



दिवा \  आरती परब : दिवा शहरातील प्रभाग क्रमांक २९ मधून खर्डी गावातील ज्येष्ठ शिवसैनिक शंकर पाटील यांनी शिवसेना (शिंदे गट) पक्षाकडून पत्नीच्या नावाने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. गेल्या तब्बल ३६ वर्षांपासून शिवसेनेसाठी एकनिष्ठेने काम करणाऱ्या शंकर पाटील यांनी यंदा प्रथमच पत्नीला निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.


प्रभाग क्रमांक २९ मध्ये येणारे खर्डी गाव, फडके पाडा, देसाई गाव, शीळ गाव तसेच मुंब्रा येथील काही भागात शंकर पाटील हे गेल्या अनेक वर्षांपासून समाजसेवेत सक्रिय आहेत. शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी सर्वसामान्य नागरिकांची अनेक मूलभूत कामे, प्रश्न मार्गी लावले आहेत. रस्त्यांच्या समस्या, पाण्याच्या लाईन, गटार दुरुस्ती, स्वच्छता, पालिकेची बालवाडी दुरुस्त करुन घेणे, तसेच नागरिकांच्या दैनंदिन अडचणी सोडवण्यात त्यांनी नेहमी पुढाकार घेतला आहे.


याशिवाय शिवजयंती, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, पालिका शाळांतील मुलांसोबत झाडे लावणे, लॉकडाउनमध्ये धान्य वाटप करणे यांसारखे विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम त्यांनी परिसरात मोठ्या उत्साहात राबवले आहेत. या सर्व कामांमध्ये त्यांच्या पत्नीनेही कायम त्यांना मोलाची साथ दिली असून सामाजिक कार्यात त्या नेहमीच त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या आहेत.


शिवसेना घराघरात पोहोचवण्याचे काम प्रभाग २९ मध्ये पाटील यांनी केले असून आजूबाजूच्या गावांतील आगरी, कोळी समाजाच्या समस्या सोडवतानाच इतर सर्व जाती- धर्मातील नागरिकांच्या अडचणीही त्यांनी समजून घेऊन त्यावर तोडगे काढले आहेत. या प्रदीर्घ सामाजिक कार्याचा अनुभव आता पालिकेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांसाठी अधिक प्रभावीपणे वापरता यावा, या उद्देशाने त्यांनी पत्नीच्या नावे उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे पाटील यांनी सांगितले.


या निर्णयामुळे प्रभाग क्रमांक २९ मध्ये शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत असून नागरिकांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.

Post a Comment

Previous Post Next Post