ग्लोबल शाळेच्या मागील बाजूस आग




अग्निशमन दलाचे जलद नियंत्रण; कोणतीही जीवितहानी नाही

दिवा \ आरती परब  : रविवारी सायंकाळी ४ वाजता आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये शीळ अग्निशमन केंद्राकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, ग्लोबल शाळेच्या मागे, दिवा आगासन रोड, दिवा (पूर्व) येथे मोकळ्या जागेत ठेवलेल्या बांबूंना आणि लाकडांना आग लागल्याची घटना नोंदवण्यात आली.


घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान तत्काळ १ पिकअप वाहनासह पोहोचले. सुदैवाने, या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी परिस्थितीवर त्वरित नियंत्रण ठेवत सुमारे ५ च्या दरम्यान आग पूर्णपणे विझवली. सध्या परिसर सुरक्षित असून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.



Post a Comment

Previous Post Next Post