दिवा- आगासन रोड परिसरात एस. वाय. टर्फचे भव्य उद्घाटन


रमाकांत मढवी यांची ‘दणदणीत फटकेबाजी’ चर्चेत

दिवा \ आरती परब  : दिवा- आगासन रोड, बेडेकर नगर येथे तयार करण्यात आलेल्या एस. वाय. टर्फ या अत्याधुनिक खेळाच्या मैदानाचे आज भव्य उद्घाटन करण्यात आले. शिवसेना शहर प्रमुख व माजी उपमहापौर रमाकांत मढवी आणि प्रेम देवकर (एशिया कप अंडर १९ साठी निवड) यांच्या हस्ते फित कापून या टर्फची सुरुवात झाली.


उद्घाटनानंतर रमाकांत मढवी यांनी आपल्या खास शैलीत मैदानावर उतरून प्रात्यक्षिक फटकेबाजी केली. राजकारणातील त्यांच्या बेधडक आणि 'फटका' शैलीप्रमाणेच, क्रिकेट मैदानावरही त्यांनी दमदार शॉट्स खेळत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या या खेळीमुळे कार्यक्रमात हास्य आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. या नवीन टर्फमुळे परिसरातील खेळाडूंना उत्कृष्ट सुविधा उपलब्ध होणार आहेत. स्थानिक मुलांना व युवकांना सरावासाठी, खेळासाठी योग्य जागा मिळाल्याने क्रीडा संस्कृतीला चालना मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.


या उद्घाटन सोहळ्याचे आयोजक शुभम बेडेकर आणि योगेश गावनंग होते. कार्यक्रमाला स्थानिक नेते शिवसेना शहर प्रमुख व माजी उपमहापौर रमाकांत मढवी आणि प्रेम देवकर, कल्याण ग्रामीण राजेश मोरे, माजी नगरसेवक शैलेश पाटील, दिपक जाधव, अमर पाटील, विभाग प्रमुख चरण म्हात्रे, शशिकांत पाटील, कमलाकर पाटील, ठाकरे पक्षाचे रोहिदास मुंडे, भाजप विजय भोईर तर स्थानिक नागरिक, खेळाडू, इतर शिवसेना पदाधिकारी आणि तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. एस. वाय. टर्फचे गणेश पूजनाने उद्घाटन पार पडले असून, परिसरातील खेळाडूंसाठी हे मैदान आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे.




Post a Comment

Previous Post Next Post