दिवा \ आरती परब : हरे कृष्ण मानवकल्याण मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, दिवा (पूर्व) यांच्या माध्यमातून आणि रोटरी क्लब दिवा ठाणे यांच्या सहकार्याने दिवा परिसरात प्रथमच मोफत डायलिसीस सेवा उपलब्ध करून देणारा उपक्रम आज यशस्वीपणे सुरु झाला.
पिवळे, केशरी रेशन कार्डधारक रुग्णांना मोफत डायलिसीस देण्याची ही सुविधा असून, अनेक नागरिकांनी उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घेतला. आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना मोठा दिलासा मिळावा, यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमाला प्रोजेक्ट हेड गणेश टावरे, प्रोजेक्ट हेड डॉ. पराग जोशी, रोटरी क्लब अध्यक्ष किशोर सदाशिव पाटील आणि सचिव स्वप्नील मारुती गायकर यांनी मार्गदर्शन केले. त्यावेळी समाजसेवक मोतीराम दळवी, साईनाथ म्हात्रे, आदित्य पाटील, युवराज बेडेकर, प्रतिक बेडेकर, सीए विकास गुंजाळ, हर्षद भगत उपस्थित होते. हॉस्पिटल प्रशासन आणि स्वयंसेवकांनी संपूर्ण दिवसभर उत्कृष्ट सेवा देत रुग्णांची विशेष काळजी घेतली.
या उपक्रमामुळे गरजू रुग्णांना महागड्या डायलिसीस खर्चातून मोठा दिलासा मिळणार असून नागरिकांनी अशा उपक्रमांचे कौतुक केले आहे.
