ठाणे प्रभाग क्रमांक 21 मध्ये भाजपचे वर्चस्व

 


चारही जागांवर भाजप उमेदवार विजयी

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025–26 च्या निकालात प्रभाग क्रमांक 21 मध्ये भारतीय जनता पक्षाने जोरदार कामगिरी करत चारही प्रभागांवर विजय मिळवला आहे. मतमोजणीअंती भाजपच्या सर्व उमेदवारांनी स्पष्ट मताधिक्याने विजय संपादन केला.


अधिकृत आकडेवारीनुसार 

प्रभाग अ मधून संजय वाघुले (भाजप) यांनी 17,738 मते मिळवत विजय मिळवला.

प्रभाग ब मधून प्रतिभा मढवी (भाजप) यांनी 17,945 मते घेत विजयी आघाडी कायम ठेवली.

प्रभाग क मधून मृणाल पेंडसे (भाजप) यांनी 16,021 मते मिळवत विजय नोंदवला.

प्रभाग ड मधून सुनेश जोशी (भाजप) यांनी 13,697 मते मिळवत विजयी झेंडा फडकावला.


या निकालामुळे प्रभाग क्रमांक 21 मध्ये भाजपचे संपूर्ण वर्चस्व स्पष्ट झाले असून पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. निकाल जाहीर होताच परिसरात जल्लोष करण्यात आला. विजयी उमेदवारांनी मतदारांचे आभार मानत प्रभागातील विकासकामांना प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले आहे.




Post a Comment

Previous Post Next Post