कल्याण \ शंकर जाधव : कल्याण - डोंबिवली महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025–26 च्या निकालात प्रभाग क्रमांक 24 मधून भारतीय जनता पक्षाच्या रसिका कृष्णा पाटील यांनी स्पष्ट मताधिक्याने विजय मिळवला आहे.
मतमोजणीच्या अधिकृत आकडेवारीनुसार भाजपच्या रसिका पाटील यांना 11,169 मते मिळाली, तर प्रतिस्पर्धी उमेदवार संगीता पाटील यांना 2,272 मते मिळाली. मोठ्या मताधिक्याने रसिका पाटील यांनी विजय संपादन केला आहे.
निकाल जाहीर होताच प्रभाग क्रमांक 24 मध्ये भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. विजयी उमेदवार रसिका पाटील यांनी मतदारांचे आभार मानत परिसराच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचे आश्वासन दिले आहे.
