ठाणे महापालिका निवडणूक निकाल
ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकच्या मतमोजणीअंती शहरातील विविध प्रभागांतील विजयी उमेदवारांचे चित्र स्पष्ट झाले आहे.
ठाणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक 4 मधून
स्नेहा रमेश आंब्रे, मुकेश मोकाशी, आशा शेर बहादुर सिंह आणि सिद्धार्थ पांडे यांनी विजय मिळवला आहे.
तर प्रभाग क्रमांक 1 मधील विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे आहेत –
- सिद्धार्थ ओवळेकर (शिवसेना)
- अनिता ठाकूर (भाजप)
- नम्रता घरत (शिवसेना)
- विक्रांत तांडेल (शिवसेना)
दरम्यान, शिंदे गटाच्या शिवसेनेने प्रभाग क्रमांक 6 मध्ये वर्चस्व राखले असून चारही उपप्रभागांत उमेदवार विजयी ठरले आहेत.
लाइव्ह मतमोजणीच्या आकडेवारीनुसार –
- प्रभाग 6/अ : सौ. वनिता संदिप घोगरे – 16,922 मते
- प्रभाग 6/ब : सौ. सरिता दिगंबर ठाकूर – 18,636 मते
- प्रभाग 6/क : श्री. प्रशांत (राजा) सुभाष जाधवर – 17,498 मते
- प्रभाग 6/ड : श्री. हणमंत ज्ञानू जगदाळे – 19,495 मते
निकाल जाहीर होताच संबंधित प्रभागांमध्ये विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी जल्लोष केला. विजयी उमेदवारांनी मतदारांचे आभार मानत शहराच्या विकासासाठी कटिबद्ध राहण्याचे आश्वासन दिले आहे.
