शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहाजी खुस्पे विजयी
प्रभाग क्रमांक १३ मध्ये शिवसेनेचे वर्चस्व
ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025–26 च्या निकालात ठाण्याचे माजी महापौर अशोक वैती यांना पराभवाला सामोरे जावे लागले असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार शहाजी खुस्पे यांनी दणदणीत विजय मिळवला आहे.
अधिकृत लाइव्ह मतमोजणीच्या आकडेवारीनुसार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहाजी खुस्पे यांना 12,860 मते मिळाली. तर शिवसेनेचे (शिंदे गट) उमेदवार आणि माजी महापौर अशोक वैती यांना 12,193 मते मिळाली. या लढतीत शहाजी खुस्पे यांनी स्पष्ट मताधिक्याने विजय संपादन केला.
या प्रभागात एकूण 27,279 मते नोंदवली गेली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार भरत गणपत पडकळ यांना 1,333 मते, अपक्ष उमेदवार हर्षद बालकृष्ण भोंईर यांना 366 मते, तर NOTA ला 527 मते मिळाली.
अ - शहाजी खुस्पे संपत (उबाठा) – 12,860 मते
ब – निर्मला शरद कणसे (शिवसेना) – 14,976 मते
क – वर्षा संदिप शेलार (शिवसेना) – 12,411 मते
ड – अनिल चिंतामण भोर (शिवसेना) – 11,749
या निकालामुळे ठाण्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले असून, माजी महापौरांच्या पराभवामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. निकाल जाहीर होताच विजयी उमेदवार शहाजी खुस्पे यांच्या समर्थकांनी जल्लोष केला.
