खारेगाव प्रभाग क्रमांक 9 मध्ये चौघांचाही विजय

 



विजयी उमेदवारांना मोठे मताधिक्य

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025–26 च्या मतमोजणीमध्ये खारेगाव प्रभाग क्रमांक 9 मधील चारही प्रभागातून उमेदवारांनी विजय मिळवला आहे. मतमोजणीच्या अधिकृत लाइव्ह आकडेवारीनुसार अ, ब, क आणि ड या सर्व प्रभागांमध्ये विजयी उमेदवार निश्चित झाले आहेत.

लाइव्ह निकालांनुसार

  • प्रभाग अ मधून गणेश कांबळे यांनी 17,062 मते मिळवत विजय मिळवला.
  • प्रभाग ब मधून अनिता गौरी यांनी 17,269 मते मिळवत प्रतिस्पर्ध्यांवर मात केली.
  • प्रभाग क मधून विजया लासे यांनी 17,282 मते घेत विजय नोंदवला.
  • प्रभाग ड मधून अभिजीत पवार यांनी 17,061 मते मिळवत विजयी झेंडा फडकावला.

प्रत्येक प्रभागात सुमारे 25 हजारांहून अधिक मते पडली असून विजयी उमेदवारांना निर्णायक मताधिक्य मिळाल्याचे मतमोजणीच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

निकाल जाहीर होताच खारेगाव परिसरात विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी जल्लोष केला. विजयी उमेदवारांनी मतदारांचे आभार मानत परिसरातील विकासकामांना प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post