कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक २०२५
डोंबिवली \ शंकर जाधव : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणूक २०२५ मध्ये बिनविरोध निवडींची संख्या वाढत असून, भाजप आणि शिवसेनेने आपापली ताकद दाखवून दिली आहे.
भारतीय जनता पक्षाच्या चार महिला उमेदवार बिनविरोध निवडून आल्या आहेत. रेखा चौधरी, आसावरी नवरे, रंजना पेणकर आणि मंदा पाटील या महिला उमेदवारांची कोणताही विरोध न झाल्याने त्यांची थेट निवड झाली. पॅनल क्रमांक २७-अ मधून मंदा सुभाष पाटील यांच्या बिनविरोध निवडीमुळे भाजपच्या बिनविरोध निवडून आलेल्या महिला उमेदवारांची संख्या चारवर पोहोचली आहे.
दरम्यान, कल्याण-डोंबिवलीमध्ये शिवसेनेचा डंका पाहायला मिळत आहे. पॅनल क्रमांक २८-अ मधून हर्षल राजेश मोरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. संबंधित प्रभागातील सर्व अपक्ष उमेदवारांनी अखेर माघार घेतल्याने हा विजय निर्विवाद ठरला.
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांकडून बिनविरोध निवडी होत असून, त्यामुळे निवडणुकीच्या राजकीय समीकरणांमध्ये महत्त्वाचे बदल होताना दिसत आहेत.

