दिवा \ आरती परब: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दिवा परिसरात भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीचे मुख्य आकर्षण पारंपरिक पुणेरी ढोल होते, ज्यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
ही रॅली दिवा गावातील कुलस्वामिनी मंदिरापासून सुरू होऊन म्हात्रे आळी, बंदर आळी, संपूर्ण दिवा गाव, गावदेवी मंदिर, मुंब्रा देवी कॉलनी परिसरातून पुढे साबे गाव येथे पोहोचली. त्यानंतर जीवदानी मंदिर व जीवदानी नगर येथे रॅलीची सांगता करण्यात आली.
या रॅलीमध्ये प्रभाग क्रमांक २७ मधील मनसेचे उमेदवार प्रकाश पाटील, नीता भगत, मयुरी पोरजी व प्रशांत गावडे यांनी सहभाग घेत शक्तीप्रदर्शन केले. रॅलीत पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत मनसेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
