एकाच दिवसात योग सत्राकरिता ९.३ लाख व्यक्ती सहभागी
मुंबई : हॅबिल्ड या भारतातील पहिल्या उत्तम सवय अंगी बाणवणाऱ्या प्लॅटफॉर्मने एका दिवसात मोस्ट योग व्ह्यूवरशीपसाठी अधिकृतरित्या जागतिक विक्रम रचला आहे, जे वर्ल्ड रेकॉर्डस युनियनने प्रमाणित केले आहे. दिवसभरात घेण्यात आलेल्या सहा लाइव्ह ऑनलाइन योग सत्रांच्या माध्यमातून हा विक्रम संपादित करण्यात आला, जेथे सर्व सत्रांमधील एकूण उपस्थित सहयोगींची एकत्रित गणना करण्यात आली. या उपक्रमाला जगभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, ज्यामध्ये ९.३ Lakh व्यक्ती सहभागी झाले होते. हा महत्त्वपूर्ण टप्पा गाठण्यासह हॅबिल्डने शाळा उभारणी उपक्रमाची देखील घोषणा केली, या उपक्रमामध्ये सहभाग घेणाऱ्या प्रत्येक नवीन सहभागीसह या शाळेच्या बांधकामासाठी एक विट दान करण्यात येईल.
हॅबिल्डच्या हर घर योगा उपक्रमाचा भाग म्हणून हा विक्रम संपादित करण्यात आला. यंदाची थीम नवीन शुभारंभांसाठी कटिबद्धतेशी अनुसरून डिझाइन करण्यात आली आहे. दर नववर्षाला आरोग्य उत्तम राखणे, व्यायाम करणे, मन प्रसन्न व शांत ठेवणे असे संकल्प केले जातात. पण जानेवारीचा मध्य काळ येईपर्यंत हे संकल्प कमी होऊ लागतात. खरेतर जानेवारीमधील दुसरा शुक्रवार 'क्विटर्स डे' म्हणून ओळखला जातो, जेथे व्यक्तींमधील उत्साह कमी होऊ लागतो आणि ते संकल्प सोडून जाण्याची शक्यता वाढते. हा जागतिक विक्रम म्हणजे हॅबिल्डने या क्विटर्स डेला दिलेला उत्तम प्रतिसाद आहे.
या उपलब्धीबाबत मत व्यक्त करत हॅबिल्डचे सह-संस्थापक व योग टीचर सौरभ बोथरा म्हणाले, ''हा दिवस विक्रमापेक्षा अधिक होता आणि अधिकाधिक व्यक्तींना त्यांच्या आरोग्याकडे अधिक लक्ष देण्यास प्रेरित करण्यात आले. सहभाग मोठ्या प्रमाणात असला तर सातत्यता वाढते. हर घर योग उपक्रमाने नियमितपणे योग करण्याची सवय निर्माण केली आहे आणि त्याप्रती उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. आमच्या समुदायाचा नेहमी सेवाभावावर विश्वास आहे. म्हणून आम्ही माझ्या वडिलोपार्जित गावामध्ये शाळा उभारण्याची देखील घोषणा केली आहे. आमच्या समुदायाच्या माध्यमातून आमच्यामध्ये सामील होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी आम्ही या शाळेच्या बांधकामप्रती एक विट दान करत आहोत.''
अधिक प्रमाणात योगा करण्याऐवजी या उपक्रमाने व्यक्तींना सहजपणे व सोपी सुरूवात करण्याचे आवाहन केले. परिपूर्णता राखण्याऐवजी सत्राला उपस्थित राहण्यासाठी कौतुक केले. तसेच या उपक्रमाने व्यक्तींना एखादी गोष्ट सोडून देण्याला अपयश न मानता नव्याने सुरूवात करण्याची संधी असते याची आठवणी करून दिली. या दिवशी अनेकांनी पुन्हा नव्याने सुरूवात केली, स्वत:वर विश्वास दाखवला आणि हा दिवस नियमितपणे योग करण्यास प्रेरित करणारा ठरला.
या उपक्रमामध्ये ४५ वर्ष व त्यापेक्षा अधिक वय असलेल्या महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला, ज्यामधून समुदाय हॅबिल्डच्या दैनंदिन योग सरावाला आकार देत असल्याचे दिसून येते. या उत्स्फूर्त सहभागामधून नियमित व सौम्य प्रमाणात योग केल्यास आजीवन सवय होऊन जाते.
हॅबिल्डसाठी हा दिवस दररोज योग सराव आणि समाजाच्या हिताप्रती काम करत राहण्याची आठवण करून देणारा ठरला आहे. यापुढे देखील व्यक्तींना त्यांच्या दैनंदिन जीवनात योगा करत राहण्यास प्रेरित करण्यात येईल.
