डोंबिवली \ शंकर जाधव : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक प्रल्हाद परशुराम म्हात्रे यांची कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेतील मनसे गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. बुधवारी (दि. २१) कोकण भवन येथे मनसेच्या स्वतंत्र गटाची अधिकृत नोंद करण्यात आली.
या वेळी मनसेच्या नगरसेवक प्रल्हाद म्हात्रे यांच्यासह संदेश पाटील, रसिका पाटील, शीतल मंढारी, गणेश लांडगे, राहुल कोट व स्वप्नाली केणे हे उपस्थित होते. या सात नगरसेवकांचा स्वतंत्र गट म्हणून महानगरपालिकेत नोंद करण्यात आली आहे.
प्रल्हाद म्हात्रे यांच्या गटनेतेपदी निवडीमुळे कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेतील राजकीय घडामोडींना वेग आला असून, आगामी काळात मनसे अधिक आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
