कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेचा ५३ नगरसेवकांचा गट स्थापन





विश्वनाथ राणे यांची गटनेतेपदी नियुक्ती; शिवसेनेला मनसे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा 


कल्याण–डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत (KDMC) शिवसेनेने ५३ नगरसेवकांचा अधिकृत गट स्थापन करत महापालिकेतील राजकीय समीकरणांवर आपली पकड अधिक मजबूत केली आहे. या गटाच्या गटनेतेपदी ज्येष्ठ नगरसेवक विश्वनाथ राणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


या घडामोडींमुळे KDMC मधील सत्तासंघर्षाला नवे वळण मिळाले असून, शिवसेनेचा प्रभावी ‘पावरगेम’ स्पष्टपणे दिसून येत आहे. शिवसेनेला मनसे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांचा जाहीर पाठिंबा मिळाल्याने शिवसेनेचे संख्याबळ मोठ्या प्रमाणात वाढले आहे.


संख्याबळाचे गणित पाहता, शिवसेना – ५३, मनसे – ५, काँग्रेस – २, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) – १ अशा एकूण ६१ नगरसेवकांचा पाठिंबा शिवसेनेकडे असल्याने महापालिकेतील निर्णयप्रक्रियेत शिवसेनेची भूमिका निर्णायक ठरण्याची चिन्हे आहेत.


विश्वनाथ राणे यांच्या गटनेतेपदी निवडीमुळे संघटनात्मक बळ वाढेल, तसेच महापालिकेतील धोरणात्मक निर्णयांमध्ये शिवसेना अधिक आक्रमक आणि प्रभावी भूमिका घेईल, असा विश्वास पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.


महापालिकेतील पुढील घडामोडी आणि सत्तास्थापनेच्या दृष्टीने हे संख्याबळ अत्यंत महत्त्वाचे मानले जात असून, KDMC च्या राजकारणात शिवसेना केंद्रस्थानी येत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.





Post a Comment

Previous Post Next Post