डी. वाय. पाटीलच्या१० विद्यार्थ्यांची क्यू-स्पायडर्स म्हणून निवड

 


कोल्हापूर \ शेखर  धोंगडे : डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या एम.सी.ए. अंतिम वर्षातील १० विद्यार्थ्यांची यशस्वी क्यू-स्पायडर्स कंपनीमध्ये निवड झाली आहे . या विद्यार्थ्याना 3.5 लाख ते ९.५ लाख वार्षिक पॅकेज मिळाले आहे.


महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागातर्फे क्यू-स्पायडर्स कंपनीच्या कॅम्पस ड्राइव्हचे आयोजन करण्यात आले होते. या प्रक्रियेत एम.सी.ए.चे एकूण ५४ विद्यार्थी सहभागी झाले होते. विविध लेखी, तांत्रिक व मुलाखत फेऱ्यांनंतर विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली.


क्यू-स्पायडर्स ही आयटी व सॉफ्टवेअर क्षेत्रातील नामांकित संस्था असून सॉफ्टवेअर प्रशिक्षण, कौशल्य विकास व प्लेसमेंट सेवांसाठी ओळखली जाते. महाविद्यालयातर्फे विद्यार्थ्यांना दिल्या जणाऱ्या तांत्रिक व सॉफ्ट स्किल्सचे प्रशिक्षणाचा  या निवड प्रक्रियेत मोठा लाभ झाला. 


यशस्वी विद्यार्थ्यांचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, स्कूल ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंटचे संचालक डॉ. अजित  पाटील यांनी अभिनंदन केले.

Post a Comment

Previous Post Next Post