प्रभाग क्र. २९ मध्ये आमदार निरंजन डावखरे उपस्थित
दिवा \ आरती परब : ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज ठामपा प्रभाग क्र. २९ मध्ये महायुतीच्या तीन उमेदवारांच्या प्रचारासाठी वरिष्ठ नेते तसेच कल्याण ग्रामीणचे माजी आमदार सुभाष भोईर यांनी सहभाग घेत जोरदार प्रचार केला. प्रचारादरम्यान नागरिकांशी थेट संवाद साधत महायुतीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
या वेळी आमदार निरंजन डावखरे यांची विशेष उपस्थिती होती. प्रभाग क्र. २९ मधील २९ अ मधून अर्चना पाटील, २९ ब मधून वेदिका पाटील आणि २९ क मधून बाबाजी पाटील हे महायुतीचे उमेदवार निवडणूक रिंगणात असून, तिन्ही उमेदवारांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून आले.
प्रचारादरम्यान बोलताना सुभाष भोईर यांनी महायुतीच्या कामांचा आढावा मांडत विकासाच्या मुद्द्यांवर भर दिला. तसेच प्रभाग क्र. २९ मधून महायुतीचे तिन्ही उमेदवार मोठ्या फरकाने विजयी होतील, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. या प्रचारामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून, निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात प्रचाराला अधिक गती मिळाल्याचे दिसून येत आहे.
