माघी गणेशोत्सवाचा समारोप आज भक्तिभावात आणि उत्साहात


डोंबिवली \ आरती परब :  डोंबिवली पश्चिम येथील जुनी डोंबिवलीमध्ये अस्तित्व प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित सार्वजनिक माघी गणेशोत्सवाचा समारोप आज भक्तिभावात आणि उत्साहात पार पडला. डोंबिवलीचा प्रती चिंतामणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणरायाचे ढोल-ताशे व ब्रास बँडच्या गजरात भव्य विसर्जन करण्यात आले.


२२ जानेवारी रोजी श्री गणेशाची स्थापना करण्यात आली होती. सात दिवस चाललेल्या या माघी गणेशोत्सवात दररोज विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. १९ जानेवारी रोजी भव्य आगमन सोहळा पार पडला असून ‘मावळे आम्ही’ ढोल-ताशा पथक हे विशेष आकर्षण ठरले. स्थापनेच्या दिवशी सायंकाळी दुर्गा देवी प्रसन्न सांस्कृतिक भजन मंडळाचे संतोष नाईक यांनी सुस्वर भजन सादर केले.


शुक्रवारी पांडुरंग लब्दे प्रस्तुत श्री देवी भगवती हे दशावतारी नाटक सादर करण्यात आले असून त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शनिवारी हळदीकुंकू कार्यक्रम, रविवारी लहान मुलांसाठी विविध स्पर्धा व नृत्यकला स्पर्धा घेण्यात आल्या. सोमवारी श्री कृष्णा प्रसादिक भजन मंडळाचा कार्यक्रम तसेच सत्यनारायण महापूजा पार पडली. मंगळवारी महाप्रसाद (भंडारा) आयोजित करण्यात आला.


अस्तित्व प्रतिष्ठानचा माघी गणेशोत्सवाचे विसर्जन खूप थाटामाटात नेहमी होतं. पण यावेळेस सकाळीच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाची दुःखद बातमी समजतात मंडळाचे पदाधिकारी आणि अध्यक्ष महेश जोशी यांनी एक सामाजिक भान ठेवून विसर्जन वाजत गाजत न काढता श्रींच्या नामघोषात मिरवणूक काढली. २०११ साली अध्यक्ष महेश जोशी यांच्या पुढाकाराने या माघी गणेशोत्सवाची सुरुवात झाली असून यंदा अस्तित्व प्रतिष्ठानला १२ वर्षे पूर्ण झाली. विसर्जनानंतरही भाविकांना भोजन देण्याची परंपरा जपली जाते, अशी माहिती सचिव संतोष होळकर यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post