राम चरणचा ‘पेड्डी’ आता एप्रिलमध्ये प्रदर्शित होणार

 


दिग्दर्शक बुची बाबू साना यांनी बुधवारी राम चरण अभिनीत ‘पेड्डी’ चित्रपटाची प्रदर्शित तारीख पुढे ढकलल्याची घोषणा केली. हा चित्रपट आता ३० एप्रिल रोजी प्रदर्शित होणार असल्याची माहिती त्यांनी सोशल मीडियावर दिली. याआधी हा चित्रपट मार्चमध्ये येणार असल्याची चर्चा होती.

पत्नी उपासना कोनिडेलासोबत नुकतेच जुळ्या बाळांचे स्वागत केल्यानंतर राम चरण गुरुवारी पुन्हा चित्रीकरणाला सुरुवात करणार असून, चित्रपटाचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात येत आहे. विविध कारणांमुळे चित्रीकरणास विलंब झाला होता.

दरम्यान, पवन कल्याणचा ‘उस्ताद भगत सिंह’ चित्रपट आता २६ मार्च रोजी प्रदर्शित होणार असून, हीच तारीख आधी ‘पेड्डी’साठी निश्चित होती.  या चित्रपटात जान्हवी कपूरही प्रमुख भूमिकेत आहे.

याआधी राम चरणने सोशल मीडियावर आपल्या तगड्या वर्कआउटचा फोटो शेअर करत भूमिकेसाठी तयार केलेल्या शरीरयष्टीचे दर्शन घडवले होते, ज्यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढली होती.

‘पेड्डी’ हा चित्रपट वृध्दी सिनेमाज, मायथ्री मूव्ही मेकर्स आणि सुकुमार रायटिंग्स यांच्या बॅनरखाली तयार होत असून, संगीतकार ए. आर. रहमान यांचे संगीत लाभणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post