नमुंमपा सभागृह नेतेपदी सागर नाईक




विरोधी पक्ष नेतेपदी विजय चौगुले यांची नियुक्ती

नवी मुंबई : च्या पहिल्या सर्वसाधारण सभेत शुक्रवारी महत्त्वपूर्ण पदनियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. पिठासन अधिकारी तथा महापौर यांनी कलम १९ (1-अ) अन्वये सभागृह नेतेपदी सागर ज्ञानेश्वर नाईक यांची नियुक्ती जाहीर केली. तसेच विरोधी पक्ष नेतेपदी विजय लक्ष्मण चौगुले यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली.

नवनियुक्त सभागृह नेते व विरोधी पक्ष नेत्यांचे महापौर सुझाता पाटील, उपमहापौर तसेच महापालिका आयुक्त यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

याच सभेत नवी मुंबई महानगरपालिका स्थायी समिती सदस्यपदी १६ सदस्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. या सदस्यांमध्ये जयवंत सुतार, सुधाकर सोनवणे, शशिकांत भोईर, अशोक पाटील, स्वाती गुरखे, अंजली वाळुंज, संदीप म्हात्रे, प्रदीप गवस, सुरेश शेट्टी, सागर नाईक, आकाश मढवी, अनिता पाटील, मंदाकिनी म्हात्रे, दिपाळी सकपाळ, सुरेश कुलकर्णी आणि सरोज पाटील यांचा समावेश आहे.

नवनियुक्त सर्व सदस्यांचे महापौर सुझाता पाटील, उपमहापौर दशरथ भगत व महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी अभिनंदन केले.



Post a Comment

Previous Post Next Post