अंबरनाथ : अंबरनाथ येथील ऐतिहासिक अंबरनाथ शिव मंदिर येथे महाशिवरात्रीची भव्य जत्रा उत्साहात पार पडली. यंदा सुमारे सहा लाख भाविकांनी महादेवाचे दर्शन घेत भक्तिभाव व्यक्त केला.
जत्रेनंतर नगराध्यक्षा CA तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील यांनी स्वतः मंदिर परिसर तसेच शिवमंदिर रोडची पाहणी करून स्वच्छतेचा आढावा घेतला. महाशिवरात्री यात्रेदरम्यान प्रसाद वाटप, पाणी वितरण, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आणि विविध विक्रेत्यांमुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात कचरा साचतो.
याची दखल घेत अंबरनाथ नगरपालिकेच्या स्वच्छता विभागासह सामाजिक संस्थांच्या माध्यमातून तात्काळ स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. साचलेला कचरा उचलून संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला. भाविकांच्या सुरक्षिततेसह स्वच्छतेला प्राधान्य देत जत्रा यशस्वीरीत्या पार पडल्याचा आनंद नगराध्यक्षांनी व्यक्त केला.

