खारटन रोड येथे माता रमाई आंबेडकर चौकाचे लोकार्पण


ठाणे : ठाणे शहरातील खारटन रोड परिसरात नूतनीकरण करण्यात आलेल्या माता रमाई आंबेडकर चौकाचे लोकार्पण उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. आमदार संजय केळकर यांच्या निधीतून साकारण्यात आलेल्या या चौकाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमास भाजपा ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संदीप लेले, ठाणे महानगरपालिकेच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर, उपमहापौर कृष्णा पाटील तसेच प्रभाग क्रमांक २२ च्या नगरसेविका उषा विशाल वाघ यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.


यावेळी उपस्थित मान्यवरांनी माता रमाई आंबेडकर यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करत वंचित घटकांसाठी त्यांच्या योगदानाची आठवण करून दिली. चौकाच्या नूतनीकरणामुळे परिसर अधिक आकर्षक व सुव्यवस्थित झाल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.


कार्यक्रमादरम्यान संगीतमय स्वरांजली अर्पण करण्यात आली. स्थानिक नागरिक, महिला व कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नगरसेविका उषा विशाल वाघ व विशाल दिलीप वाघ यांच्या प्रयत्नांमुळे हा सोहळा शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.



Post a Comment

Previous Post Next Post