राजेश नार्वेकर यांची राज्याच्या परिवहन आयुक्तपदी नियुक्ती

 



मुंबई : राज्याचे विद्यमान परिवहन आयुक्त यांची (एमपीएससी) अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या जागी नव्या परिवहन आयुक्त म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नार्वेकर यापूर्वी राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागात आयुक्त म्हणून कार्यरत होते.

२००९ बॅचचे आयएएस अधिकारी असलेल्या नार्वेकर यांनी इतिहास विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. १९९४ मध्ये महाराष्ट्र प्रशासकीय सेवेत उपजिल्हाधिकारी म्हणून त्यांनी शासकीय सेवेला सुरुवात केली. त्यानंतर विविध महत्त्वाच्या पदांवर त्यांनी कार्य केले आहे.

यापूर्वी त्यांनी , नोंदणी व मुद्रांक विभाग तसेच (एमआयडीसी) येथे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जबाबदाऱ्या सांभाळल्या. २०१८ ते २०२२ या कालावधीत त्यांनी जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले. तसेच काही काळ आयुक्त म्हणूनही त्यांनी पदभार सांभाळला. २०१६-१७ दरम्यान त्यांनी येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्य केले.

त्यांच्या कामाची दखल घेत विविध स्तरांवर त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. अंतर्गत केलेल्या कामगिरीबद्दल तसेच २०१९ मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून बजावलेल्या जबाबदारीबद्दल त्यांचा गौरव झाला आहे. कोविड-१९ काळातील उपाययोजनांसाठीही त्यांना ‘सेवा पुरस्कार’ प्रदान करण्यात आला होता.

याशिवाय प्रकल्पात त्यांनी योगदान दिले असून, त्या संदर्भात जपानमधील ओसाका येथे विशेष प्रशिक्षणही घेतले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post