गॅस टंचाईवर मनसेचा आक्रमक पवित्रा

 


ठाण्यात शासनाची आपत्कालीन हेल्पलाईन सुरू

दिवा / आरती परब :  अमेरिका, इजरायल आणि इराण यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर देशातील घरगुती व औद्योगिक गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला असून दिवा परिसरात गॅस सिलिंडरची टंचाई जाणवू लागली आहे. यामुळे सामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते.


शिवशक्ती, जयशक्ती, तृप्ती आणि श्रद्धा गॅस एजन्सीकडून सिलिंडर उशिरा मिळत असल्याने नागरिक त्रस्त झाले होते. या समस्येविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आक्रमक झाली असून वारंवार आवाज उठवण्यात आला. बहुतांश एजन्सींच्या तक्रारी मार्गी लागल्या असल्या तरी श्रद्धा गॅस एजन्सी संदर्भातील समस्या कायम राहिल्याने मनसेने जिल्हाधिकाऱ्यांकडे औपचारिक तक्रार दाखल केली.

या तक्रारीची दखल घेत उपनियंत्रक, शिधावाटप “फ” परिमंडळ, ठाणे यांनी नागरिकांच्या तक्रारी नोंदवण्यासाठी आपत्कालीन कक्ष स्थापन केला आहे. या कक्षामार्फत नागरिकांना गॅस एजन्सीविरोधात तक्रार नोंदवण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक तसेच व्हॉट्सॲप सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

दिवा परिसरातील कोणत्याही नागरिकाला वेळेत गॅस सिलिंडर मिळत नसेल, तर त्यांनी तत्काळ या आपत्कालीन कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांना फोन, व्हॉट्सॲप किंवा ई-मेलद्वारेही तक्रार नोंदवता येणार आहे.

उपनियंत्रक, शिधावाटप “फ” परिमंडळ, ठाणे कार्यालय :
आरामबाग इस्टेट, बौर सावरकर मार्ग, ठाणे (प) – ४००६०१


आपत्कालीन हेल्पलाईन : नागरिकांनी आपल्या हक्काच्या सेवेसाठी पुढे येत तक्रारी नोंदवाव्यात, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post