अलिबाग : भारतीय जनता पार्टीच्या दक्षिण रायगड जिल्हा महिला मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी ॲड. पल्लवी सत्यजित तुळपुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे पक्षाच्या महिला संघटनात नवचैतन्य निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
अलिबाग येथील रहिवासी असलेल्या ॲड. तुळपुळे यांच्यावर पक्षाने महत्त्वाची जबाबदारी सोपवली असून, महिला मोर्चाचे संघटन अधिक मजबूत करण्यावर त्यांचा भर राहणार आहे. तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचून त्यांना पक्षाशी जोडण्याचे काम प्राधान्याने करण्याचे निर्देशही पक्षाच्या वतीने देण्यात आले आहेत.
पक्ष नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली केंद्र व राज्यातील विकास धोरणांमध्ये महिलांचा अधिकाधिक सहभाग वाढवण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यातील महिला कार्यकर्त्यांना एकत्र आणत पक्षाच्या विचारधारेचा प्रसार करण्यासाठी ॲड. तुळपुळे प्रभावीपणे काम करतील, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
