ग्लोबल इंग्लिश स्कूलचा एसएससी निकाल 100% टक्के


विद्यार्थ्यांची उज्वल कामगिरी

दिवा \ आरती परब : संवेदना एज्युकेशनल अँड चॅरिटेबल ट्रस्ट संचलित ग्लोबल इंग्लिश स्कूलने एसएससी परीक्षा २०२५- २६ मध्ये 100% टक्के निकालाची गौरवशाली परंपरा कायम राखली आहे. शाळेने १०० टक्के निकालाची नोंद करत विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश संपादन केले आहे.


यावर्षीच्या निकालात विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय गुण मिळवत शाळेचा नावलौकिक उंचावला. शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये सचिन पंडित याने ९५.८० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. तर जान्हवी लिगम हिने ९२ टक्के गुणांसह द्वितीय, अनुज यादव याने ९१ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला.


तसेच गायत्री सामजीस्कर हिने ९०.४० टक्के आणि सलोनी गुप्ता हिने ९० टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले. शाळेतील तब्बल २३ विद्यार्थ्यांनी ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवले असून ४४ विद्यार्थ्यांनी ७० टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त केले आहेत.


या यशाबद्दल शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे आणि पालकांचे अभिनंदन केले आहे. विद्यार्थ्यांची मेहनत, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचा सातत्यपूर्ण पाठिंबा यामुळे हे यश मिळाल्याचे शाळेच्या वतीने सांगण्यात आले. या यशामुळे परिसरात शाळेचे कौतुक होत असून विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post