सलग १५ व्या वर्षी बाजी
रत्नागिरी : च्या मार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला असून, कोकण विभागाने यंदाही राज्यात अव्वल स्थान कायम राखत ९७.६२ टक्के निकालाची नोंद केली आहे. विशेष म्हणजे सलग १५ व्या वर्षी कोकण विभागाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
जिल्हानिहाय निकालात जिल्ह्याने ९८.१३ टक्के निकालासह विभागात प्रथम क्रमांक मिळवला. तर जिल्ह्यानेही उत्कृष्ट कामगिरी नोंदवली. गेल्या वर्षी (२०२५) कोकण विभागाचा निकाल ९८.८२ टक्के होता, त्यामुळे यंदा १.२० टक्क्यांची किंचित घट झाली आहे.
यंदा विभागातून एकूण २५,१७२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी २४,५७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मुलांचा निकाल ९६.७३ टक्के तर मुलींचा निकाल ९८.५५ टक्के लागला असून मुली पुन्हा एकदा १.८२ टक्क्यांनी सरस ठरल्या आहेत.
खाजगी विद्यार्थ्यांचा निकाल ७१.५७ टक्के, तर पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा निकाल ३९.०३ टक्के लागला आहे. परीक्षेदरम्यान गैरमार्गाचे प्रमाण अत्यल्प राहिले. दोन्ही जिल्ह्यांत प्रत्यक्ष परीक्षेदरम्यान गैरप्रकार उघडकीस आले नाहीत; मात्र परीक्षोत्तर चौकशीत चार गैरप्रकार आढळले असून त्यातील दोन दोषी विद्यार्थ्यांवर मंडळाने कारवाई केली आहे.
दरम्यान, गुणपडताळणी किंवा उत्तरपत्रिकेची छायाप्रत हवी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मंडळाने ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केली असून ९ मे ते २३ मे २०२६ या कालावधीत विद्यार्थी अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करू शकतात.
