अ‍ॅमिटी ऑनलाईन नॅशनल स्कॉलरशिप अ‍ॅप्टिट्यूड टेस्टची घोषणा

 


ऑनलाईन उच्च शिक्षण क्षेत्रात शिष्यवृत्तीचे नवे मार्ग खुले


मुंबई : भारतातील अग्रगण्य ऑनलाईन विद्यापीठांपैकी एक असलेल्या Amity University Online ने ‘अ‍ॅमिटी ऑनलाईन नॅशनल स्कॉलरशिप अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट’ (AONSAT) २०२६ च्या शुभारंभाची घोषणा केली आहे. उच्च शिक्षणासाठी गुणवत्ताधारित शिष्यवृत्ती उपलब्ध करून विद्यार्थ्यांना अधिक संधी उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.


पहिली एओएनएसएटी परीक्षा रविवार, १० मे २०२६ रोजी आयोजित करण्यात येणार असून पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी अधिक सुलभ, किफायतशीर आणि संधींनी युक्त शिक्षणाचा मार्ग खुला करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण उपक्रम मानला जात आहे.


आजच्या काळात विद्यार्थी उच्च शिक्षणात लवचिकता, परवडणारी फी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा शोध घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर एओएनएसएटी ही केवळ प्रवेश प्रक्रिया न राहता व्यापक शिष्यवृत्ती उपक्रम म्हणून राबविण्यात येत आहे. ऑनलाईन-प्रोक्टर्ड आणि पारदर्शक परीक्षेद्वारे गुणवंत विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना आर्थिक पाठबळ देण्याचा या योजनेचा उद्देश आहे.


या उपक्रमाबाबत बोलताना अजित चौहान म्हणाले, “उच्च शिक्षणाने केवळ दारे उघडी करून चालणार नाही, तर विद्यार्थ्यांच्या कौशल्याला ओळखून त्यांना योग्य संधी आणि पाठबळ देणे आवश्यक आहे. एओएनएसएटीच्या माध्यमातून आम्हाला देशातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी विश्वासार्ह आणि व्यापक व्यासपीठ उभारायचे आहे.”


या शिष्यवृत्ती योजनेनुसार पदवी आणि पदव्युत्तर विभागातील प्रथम क्रमांकाच्या प्रत्येकी एका विद्यार्थ्याला १०० टक्के शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. दुसऱ्या क्रमांकावरील प्रत्येकी दोन विद्यार्थ्यांना ५० टक्के, तर तिसऱ्या क्रमांकावरील प्रत्येकी तीन विद्यार्थ्यांना २० टक्के शुल्क सवलत दिली जाईल.


याशिवाय, परीक्षेत पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना पहिल्या सत्राच्या शुल्कावर २५ टक्क्यांपर्यंत शिष्यवृत्ती मिळण्याची संधी उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे या परीक्षेसाठी कोणतेही नोंदणी शुल्क आकारले जाणार नाही.


अ‍ॅमिटी युनिव्हर्सिटी ऑनलाईनचा हा उपक्रम उच्च शिक्षण क्षेत्रात ‘सक्रिय संधी निर्मिती’चे नवे मॉडेल ठरणार असून शिष्यवृत्तीला केवळ आर्थिक मदतीचे साधन न ठेवता विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती आणि सामाजिक उन्नतीचे प्रभावी माध्यम बनविण्याचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post