फुटबॉलचा महाकुंभ ११ जूनपासून


 FIFA World Cup 2026: ३ देश, ४८ संघाचा समावेश 

नवी दिल्ली: जगातील सर्वात मोठ्या क्रीडा स्पर्धांपैकी एक असलेल्या FIFA World Cup 2026 स्पर्धेचे वेळापत्रक आणि गट जाहीर झाले असून यंदाचा विश्वचषक ११ जून ते १९ जुलै २०२६ दरम्यान रंगणार आहे. विशेष म्हणजे, इतिहासात प्रथमच ही स्पर्धा तीन देशांत युनायटेड स्टेट्स, मेक्सिको आणि कॅनडा येथे संयुक्तपणे आयोजित केली जात आहे.

यंदाच्या स्पर्धेचे आणखी एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे संघांची संख्या ३२ वरून ४८ करण्यात आली आहे. त्यामुळे स्पर्धेची व्याप्ती आणि थरार अधिक वाढणार आहे. फुटबॉल प्रेमींसाठी हा विश्वचषक एक ऐतिहासिक आणि रोमांचक अनुभव ठरणार असून, नव्या फॉरमॅटमुळे अनेक नव्या संघांना आपली छाप पाडण्याची संधी मिळणार आहे.



Post a Comment

Previous Post Next Post