ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनलचे ८ उमेदवार बिनविरोध


ठाणे : ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत सहकार पॅनलचे आठ उमेदवार बिनविरोध निवडून आल्याबद्दल ज्येष्ठ नगरसेवक हनमंत जगदाळे यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

याप्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेत सहकार क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रगतीसाठी तसेच सभासदांच्या हितासाठी नव्याने निवडून आलेले संचालक मंडळ प्रभावी नेतृत्व प्रदान करेल, असा विश्वासही मान्यवरांनी व्यक्त केला.

सहकार चळवळीची समृद्ध परंपरा अधिक बळकट करत विकासाच्या नव्या संधी निर्माण करण्याचा संकल्प यावेळी मांडण्यात आला.

या पत्रकार परिषदेला राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, शिवसेना सचिव तथा ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे, खासदार सुरेश म्हात्रे, आमदार रविंद्र फाटक, आमदार शांताराम मोरे, आमदार किसन कथोरे, माजी आमदार क्षितिज ठाकूर यांच्यासह विविध मान्यवर, लोकप्रतिनिधी आणि विजयी उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#HanmantJagdale #Shivsena #Thane

Post a Comment

Previous Post Next Post