नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांची 112 नंबरची सेवा


  • महिलांसाठी विशेष पथक
  • 5 ते 7 मिनिटात मिळणार मदत

डोंबिवली : पाश्चिमात्य संस्कृतीप्रमाणे 31 डिसेंबरच्या रात्री नवीन वर्षाचे स्वागत करताना सार्वजनिक आणि खाजगी ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले जातात. अशावेळी मारामारी  आणि महिलांची छेडछाड होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून पोलिसांनी 112 नंबर ही सेवा उपलब्ध करून दिली आहे. विशेष म्हणजे महिलांच्या सुरक्षततेसाठी महिला पोलीस पथक स्थापन करण्यात आले आहे. एखाद्या व्यक्तीवर संकट आल्यास त्याने हा नंबर डायल केल्यास 5 ते 6 मिनिटात मदत मिळू शकेल असे पोलीस उपायुक्त संजय गुंजाळ यांनी सांगितले.


नवीन वर्षाच्या स्वागत करताना कोणतीही घातपातचे प्रकार होऊ नये याकरता पोलिसांनी मदतीसाठी 112 हा नंबर ही यंत्रणा मदत म्हणून उपलब्ध करून दिली आहे. शहरातील प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये महिला पोलीस कर्मचार्‍यांची दोन पथके स्थापन करण्यात येणार आहे. ही पथके 31 डिसेंबरच्या रात्री विशेषतः महिलांच्या सुरक्षिततेवर भर देणार आहेत.गर्दीच्या ठिकाणी ही पथकं गस्त घालणार आहेत.नवीन वर्षाचे स्वागत करताना अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवला जातो. मात्र एखादा व्यक्ती अडचणीत आल्यास त्याने आधी 112 नंबर डायल करावे.त्यानंतर हा कॉल हा नंबर नवी मुंबईच्या कॉल सेंटर केंद्रावर जाईल. येथून तातडीने तक्रारदाराच्या आसपास असलेल पोलीस स्टेशन किंवा इतर पोलीस यंत्रणा यांच्यापर्यँत पोहचवला जातो.यामुळे तक्रारदाराला लगेच मदत मिळू शकते. अवघ्या 5 ते 7 मिनिटात ही मदत दिली जाणार आहे. याची माहिती जनतेला मिळावी याकरता कल्याण परीमंडळ 3 च्या वतीने ठिकठिकाणी सुमारे 10 हजार पत्रक लावल्यात आली आहे.पोलीस कल्याण डोंबिवली शहरात अनेक ठिकाणी नाकाबंदी  करणार आहे.




Post a Comment

Previous Post Next Post