मुंबई: चीन, जपान, अमेरिका, दक्षिण कोरिया, ब्राझील आणि फ्रान्स या देशांमध्ये कोविड-१९ च्या रुग्णांमध्ये वाढ दिसून येत असल्याने, केंद्र सरकारने २० आणि २२ डिसेंबर २०२२ रोजी अद्ययावत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.या उपाययोजना कोविड-१९ विषाणूचा प्रसार नियंत्रित करण्यात आणि जनतेचे आरोग्य राखण्यात महत्त्वपूर्ण ठरले आहे. सर्व पॉझिटिव्ह नमुने जनुकीय तपासणी करिता राष्ट्रीय विषाणूविज्ञान (NIV) (पुणे) प्रयोगशाळेत पाठवले जातील. कोविड-१९ चाचण्यांसाठी पुरेश्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत
● कोविड-१९ विषाणूबद्दल जनजागृती वाढवणे आणि कोविडचा प्रसार रोखण्यासाठी योग्य/ सुसंगत वर्तनाचा वापर करणे,
● कोविड रुग्ण व त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचे सर्वेक्षण करणे
● नियमित RT-PCR चाचणीवर भर देणे,
● वॉर्ड वॉर रूमद्वारे जनतेशी प्रभावीपणे संवाद साधणे.
● लसीकरण मोहीम प्रभावीपणे पार पाढणे
● महानगरपालिकेने कोविड-१९ रूग्णांच्या उपचारासाठी सुसज्ज रुग्णालये आणि जनरल बेड, ऑक्सिजन बेड, अतिदक्षता बेड उपलब्ध करून दिली आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे मुख्यतः कोविड-१९ च्या रूग्णांवर उपचार करणारी २ रुग्णालये आहेत. सेव्हन हिल्स (१७०० बेड) आणि कस्तुरबा (३५ बेड). चार सरकारी रुग्णालये - कामा रुग्णालय (१००), सेंट जॉर्ज रुग्णालय (७०), टाटा रुग्णालय (१६), जगजीवन राम रुग्णालय (१२) आणि ८७१ खाटांची २६ खासगी रुग्णालये आहेत. ऑक्सिजन आणि आयसीयू बेड पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. या सर्व रुग्णालयातील रुग्णांच्या भरतीचे व्यवस्थापन वॉर्ड वॉर रूमद्वारे केले जाईल.
महानगरपालिकेच्या २४ वार्डांमध्ये, वॉर्ड वॉर रूम २४ x ७ कार्यरत आहेत, नागरिक कोणत्याही अडचणीच्या वेळी त्यांच्याशी संपर्क साधू शकतात.कोविड-१९ रुग्णांचे व्यवस्थापन करण्यासाठी लिक्विड मेडिकल ऑक्सिजन (LMO), ड्युरा सिलेंडर्स आणि PSA टँकच्या स्वरूपात पुरेशी ऑक्सिजन सुविधा उपलब्ध आहे.
कोविड-१९ चा प्रसार नियंत्रित करण्यासाठी, महानगरपालिका लसीकरण मोहिमेची कठोर अंमलबजावणी करण्यावर भर देत आहे. या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून, स्वतःचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे कोविड-१९ च्या संक्रमणापासून संरक्षण करू शकतात. या कृती कोविड-१९ चा प्रसार नियंत्रित करण्यासाठी आणि नागरिकांचे आरोग्य राखण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील.
कोविड-१९ चा प्रसार रोखण्यासाठी योग्य वर्तनाचे पालन करणे महत्वाचे आहे
● सार्वजनिक ठिकाणी मास्क लावणे
● इतरांपासून अंतर राखणे
● साबण आणि पाण्याने वारंवार हात धुणे, आणि
● आजारी असताना घरी अलगीकरणात राहणे.
● वृद्ध नागरिक आणि मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी योग्य ती खबरदारी घ्यावी.
●सर्व नागरिकांनी लसीकरण आणि प्रिकॉशनरी डोस घ्यावा.

