नागपूर : "दया, क्षमा, शांती, परोपकाराचा संदेश देणाऱ्या येशू ख्रिस्तांचे जीवन मानवतेच्या कल्याणासाठी समर्पित होते. मानवसेवेचा आदर्श, प्रेरणास्रोत असलेल्या येशूंच्या जन्म दिनानिमित्ताने साजरा होणारा नाताळचा सण सर्वांच्या जीवनात आनंद, सुख, शांती, समाधान, समृद्धी, उत्तम आरोग्य घेऊन येवो. हा सण समाजात एकता, बंधुता, सहकार्याची भावना वाढीस लावणारा ठरो," अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यातील जनतेला नाताळच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Tags
महाराष्ट्र
