वैज्ञानिक दृष्टिकोनातून आले अंधश्रद्धा नाकारण्याचे बळ

  • अंनिसच्या आठ बाल वक्त्यांचे प्रतिपादन 


मुंबई : अंधश्रद्धा आपले नुकसान करते, तिला नाकारले की जीवन आनंदी होते. अंधश्रद्धांना भिण्याची काहीच गरज नाही. आम्ही त्या नाकारल्या,आम्हाला काहीही झाले नाही. आमच्यावर झालेल्या संस्कारातून आलेल्या वैज्ञानिक दृष्टिकोनाने अंधश्रद्धांना नाकारण्याचे बळ दिले, या आशयाचे प्रतिपादन आठ बाल वक्त्यांनी आपल्या वैशिष्ट्य आणि अनुभवयुक्त मार्गदर्शनातून केले.

अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या युवा शाखेने सुरू केलेल्या ४० वर्षपूर्ती प्रबोधन महोत्सव - २०२२ निमित्त वर्षभर राज्यात राबविलेल्या समग्र युवा जागृती व्याख्यानमालेच्या समारोपीय आभासी महाव्याख्यानात, आम्ही अशा नाकारल्या अंधश्रद्धा विषयावर मयुरी भोयर , चार्वाक गुल्हाणे , स्वरा दमकोंडवार , शोन जयस्वाल, दिप्तांशू खुदरे , रुचिरा सपाटे , प्रथमेश वानखेडे , सान्वी वंजारे प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी अ.भा.अंनिस चे राष्ट्रीय अध्यक्ष मधुकर कांबळे , समारोपीय मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र युवा संघटक पंकज वंजारे , प्रमुख पाहुणे म्हणून अथर्व भिंगारे , जिल्हा ई - संपर्क तथा प्रसिद्धी प्रमुख अ.भा.अं.नि.स. - युवा शाखा, वर्धा उपस्थित होते.

अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीला २० डिसेंबर रोजी ४० वर्षपूर्ती निमित्त प्रबोधनाचे ४० वर्ष , ४० युवा व्याख्यान हा महत्वकांक्षी उपक्रम डिसेंबर २०२१ मध्ये अ.भा.अंनिस - युवा शाखेने सुरू केला होता. चाळिसाव्या पुष्पात ८ ते १६ वयातील आठ बाल वक्त्यांनी मोठ मोठ्यांची बोबडी वळेल, थरकाप सुटेल अशा अनेक अंधश्रद्धाचे निर्मूलन कृतीतून कसे केले हे सांगितले. विविध उदाहरणे, संत वचन आणि सोप्या भाषेतील व्याख्यानातून त्यांनी चळवळीतील आपल्या भावी नेतृत्वाचे स्पष्ट संकेत दिले. 

अ.भा.अंनिस - युवा शाखा द्वारा संचालित 'युवा वक्ता संवर्धन प्रकल्प- २०२२' हा अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे संस्थापक प्रा. श्याम मानव यांच्या मार्गदर्शनात, अ.भा.अंनिस महाराष्ट्र राज्य युवा संघटक तथा प्रसिद्ध युवा वक्ते पंकज वंजारे यांनी, नागपूर येथून ५ ऑगस्ट २०१८ रोजी वक्तृत्व प्रशिक्षण कार्यशाळा घेऊन सुरू केला होता. राज्यातील विविध ठिकाणी ७ वक्तृत्व प्रशिक्षण कार्यशाळा चळवळीतील निवड करण्यात आलेल्या युवक , युवती , विद्यार्थ्यांकरिता आयोजित करण्यात आल्या. यातून निवड झालेल्या विविध जिल्ह्यातील ३९ युवा वक्त्यांनी ३९ व्याख्यानात विविध विषयांवर मार्गदर्शन केले होते. यामध्ये निलेश मिसाळ, मंजुषा खुदरे, स्वाती शिर्के , प्रफुल पवार, स्नेहल जगताप , युवराज राठोड , प्रशांत वेडेकर , श्रावण खुदरे, सुमेध जाधव , संतोष पाटील, प्रा. प्रज्ञानंद थोरात , धम्मदीप साखरे , ॲड. सिद्धार्थ सपकाळे , सुमित उगेमुगे, नसीर पठाण , सरगम शहारे , निलेश गावंडे , सुरेंद्र वानखेडे , गणेश सांगळे, चंदन चव्हाण, तेजस्विनी क्षीरसागर , ॲड. प्रियंका साळवे , आशिष मोडक, सचिन थुटे, गणेश काळे, क्रांतीस्नेहल पाटील , प्रा.अविनाश खिल्लारे, हर्षाली लोहकरे, डॉ. विवेक जोगे , प्रथमेश आकरे , रितेश पाटील , सोनिया डोंगरे, निशा गुरव, मेघा मिश्रा, नवीनकुमार कांबळे , श्वेता ठाकरे, निलेश बोबडे, दिनेश मगरे, चंद्रकांत पवार या विविध जिल्ह्यातील युवा वक्त्यांचा समावेश यात होता. युवांना वक्तृत्वाचे प्रशिक्षण देऊन समग्र युवा जागृती व्याख्यानमालेच्या माध्यमातून राज्यातील ४७ वक्त्यांना २० जिल्ह्यात विचारपीठ उपलब्ध करून देण्यात आले. समारोपीय व्याख्यानात युवा शाखेचे राज्य आय. टी. सेल प्रमुख तथा समग्र युवा जागृती व्याख्यानमाला मुख्य संयोजक युवराज राठोड यांनी प्रास्ताविकेतून समितीची भूमिका, समितीमार्फत राबविलेले विविध उपक्रम तसेच युवा शाखेच्या विविध प्रकल्पांची माहीती दिली. 

 महाव्याख्यानाचे अध्यक्ष मधुकर कांबळे यांनी, प्रा. श्याम मानव यांनी सुरू केलेली अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे बविष्य सशक्त पिढीकडे जाणार आहे. या पिढीने प्रबोधनाचे उद्दिष्ट पूर्ण करत समाज बदलवावा,असे आवाहन त्यांनी केले. 

युवा शाखेचे राज्य संघटक पंकज वंजारे यांनी समारोपीय मार्गदर्शन केले. युवा शाखा बुलढाणा जिल्हा सचिव रितेश पाटील यांनी बाल वक्त्यांचा तर वर्धा जिल्हा युवा सहसंघटक तेजस्विनी क्षिरसागर यांनी अध्यक्ष तथा प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन बुलढाणा जिल्हा युवा सहसंघटक सुमेध जाधव यांनी केले तर गोंदिया जिल्हा युवा संघटक कमलेश शरणागत यांनी आभार मानले. समग्र युवा जागृती व्याख्यानमाला यशस्वी करण्यासाठी युवा कोअर समिती सदस्या रिंकेश भिसे, मंजुषा खुदरे, सुमित उगेमुगे, सेजल फेंडर, श्रावण खुदरे , युवा शाखा राज्य सचिव हर्षाली लोहकरे यांच्या मार्गदर्शनात समग्र युवा जागृती व्याख्यानमाला मुख्य संयोजक युवराज राठोड, संयोजक समिती सदस्य सेजल फेंडर, सुमेध जाधव, तेजस्विनी क्षिरसागर, कमलेश शरणागत, रितेश पाटील, नसीर पठाण - युवा शाखा यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post