पॅरिसमध्ये झालेल्या अंदाधुंद गोळीबारात तीन ठार




गोळीबार करणाऱ्यास अटक, चार जण जखमी 

पॅरिस : शहराच्या गजबजलेल्या ठिकाणी शुक्रवारी अंदाधुंद गोळीबाराची घटना घडली आहे. या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झाला असून चार जखमी झाल्याचे वृत्त आहे. वृत्तसंस्थेने  दिलेल्या माहितीनुसार, गोळीबार करणाऱ्या वक्तीला पॅरिस पोलिसांनी अटक केली आहे. या गोळीबाराच्या मागचे नेमके कारण काय हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

पॅरिस शहराच्या रु डी एनघेईन या मध्यभागी असलेल्या ठिकाणी हा गोळीबार घडला आहे. मेट्रो स्टेशनपासून जवळ असलेल्या कुर्दिश सांस्कृतिक केंद्राजवळ ही गोळीबाराची घटना घडली. मेट्रो स्टेशन जवळील रस्त्यावर अनेक रेस्टॉरंट्स आणि दुकाने तसेच सांस्कृतिक केंद्र आहे. त्यामुळे या ठिकाणी देशातील आणि विदेशातील पर्यंटकांची नेहमीच गर्दी असते. या ठिकाणी गोळीबाराची घटना घडल्यानंतर मोठा गोंधळ उडाला. या प्रकरणी 69 वर्षाच्या संशयिताला पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतले आहे.

गोळीबारात जखमी झालेल्यांपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर त्याने हल्ल्यात वापरलेले शस्त्र जप्त केले अशी माहिती आहे. गोळीारात जखमी झालेल्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post