डोंबिवली / शंकर जाधव : गेल्या १० वर्षापासून डोंबिवली पूर्वेकडील सागाव येथील श्री सागांवेश्वर शिव मंदिरात महाशिवरात्र उत्सव साजरा केला जातो. मंदिराचे अध्यक्ष कर्ण मदन जाधव, सीमा जाधव, यांसह सचिन म्हात्रे, देवदत्त तिवारी, ए.के.सिंग यांसह अनेकांचे मंदिरातील उत्सवाला सहकार्य असते.सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण मंदिराला सहकार्य लाभत असते.माजी नगरसेवक महेश पाटील हे दरवर्षी महाशिवरात्रीला शिवशंकराचे दर्शन घेतात. महाशिवरात्रीला सकाळपासून महादेवाचे दर्शन घेण्यासाठी भाविक रांगेत उभे असतात. अत्यंत भक्तिभावाने भक्त महादेवाचे दर्शन घेऊन आपल्या मनातील इच्छा सांगतो. दुसऱ्या दिवशी भंडारा ( महाप्रसाद ) आयोजित केला जात असून महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी हजारो भाविक मंदिरात येत असतात. या मंदिराच्या आवारात भाजप मानस प्रचार हौसाबाई चॅरीटेबल सेवा संस्थेच्या वतीने श्री राम कथाज्ञयज्ञ करण्यात आले. कलश यात्रा काढण्यात आली.