डोंबिवली / शंकर जाधव : शिवसेना नाव आणि धनुष्य बाण चिन्ह मिळाल्यानंतर ढोल ताशाच्या गजरात डोंबिवली शिवसेना मध्यवर्ती शाखेसमोर जल्लोष करण्यात आला.दीपेश म्हात्रे, महेश पाटील,जनार्दन म्हात्रे,नितीन पाटील,रवी पाटील, संजय पावशे,जयंता पाटील, राहुल म्हात्रे, संतोष चव्हाण, वैभव राणे,अमित बनसोडे,प्रकाश माने,बंडू पाटील, सारिका चव्हाण, स्वाती मोहिते, पांडुरंग चव्हाण, ज्ञानेश्वर पवाr, शैलेंद्र भोजने यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जल्लोष केला.शहर शाखे समोर मोठ्या उत्साहात पदाधिकारी ,कार्यकर्ते यांनीं फटाके वाजवीत आणि एकमेकांना पेढे भरविले. कार्यकर्ते जोरदार नाचू गावू लागलेत आणी लोकशाही च्या विजयाचा आनंद व्यक्त केला.