वंचित बहुजन आघाडीची मागणी
डोंबिवली / शंकर जाधव : राष्ट्रनिर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक नवी मुंबई, ऐरोलीच्या धर्तीप्रमाणे कल्याण डोंबिवली महानगर पालिका माध्यमातून डोंबिवली विभागीय कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकच्या जवळील महापालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयाच्या आवारात उभारावे या मागणीसाठी डोंबिवली शहरातील नागरिकांनी वंचित बहुजन आघाडी नेतृत्वाखाली शनिवारी डोंबिवली पूर्व येथील इंदिरा चौकात स्वाक्षरी मोहीम घेतली. या मोहीमेला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाल्याचे शहराध्यक्ष सुरेंद्र ठोके यांनी सांगितले.
या मोहिमेत डोंबिवली शहरातील सामाजिक, धार्मिक, राजकीय, शैक्षणीक क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवर उपस्थित होते. सदर स्वाक्षरी मोहीमला भारतीय बौद्ध महासभाचे गौतम सुतार गुरुजी, अशोक वाव्हुळे गुरुजी, वंचित बहुजन आघाडी डोंबिवली शहर अध्यक्ष अस्मिता ताई सरोदे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे डोंबिवली शहरप्रमुख विवेक खामकर, संदिप नाईक, हेमंत म्हात्रे आणि कार्यकर्ते यांच्यासह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक संवर्धन संस्थेचे अध्यक्ष रविकिरण मस्के, आशिष कांबळे, निलेश कांबळे, विजय इंगोले, जन संस्थेचे कामगार नेते सह्याद्री सामाजिक संस्थेचे अध्यक्ष नवनाथ मोरे, फेरीवाला संघटनेचे नेते बबन कांबळे उपस्थित होते. ही स्वाक्षरी मोहीम शहराध्यक्ष सुरेंद्र ठोके यांच्या नेतृत्वात घेण्यात आली होती. स्वाक्षरी मोहीम यशस्वी करण्यासाठी महासचिव ऍड. मिलिंद साळवे, प्रशिक सामाजिक संघटना अध्यक्ष बाजिराव माने, अर्जुन केदार, वैजनाथ कांबळे, अशोक गायकवाड, राजु काकडे, दिपक भालेराव, गौतम डबाळे आदींनी विशेष मेहनत घेतली.