एलिफंटा ते गेटवे ऑफ इंडिया हे 12किलोमीटर अंतर 3 तास 41 मिनिटात 12 किमी पोहून पार
डोंबिवली / शंकर जाधव: कल्याण येथील लोकधारा सेंट् ज्यूडस् स्कूल मध्ये सहावीत शिकत असलेली अनंका गायकवाड हिने एलिफंटा ते गेटवे ऑफ इंडिया हे 12 किलोमीटर अंतर 3 तास 41 मिनिटात 12 किमी.पोहून पार केले.गेटवे ला आल्यावर प्रशिक्षक विलास माने व रवि नवले,संतोष ,नील लबदे यांनी अनंकाचा सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.
डोंबिवलीतील यश जिमखाना येथे अनंका पोहोचण्याचे प्रशिक्षण घेते.बेसिक स्विमिंग शिकून झाल्यावर तिला प्रशिक्षक विलास माने यांच्याकडे ॲडवान्स कोचिंग सुरू केले. 3 ते 4 महिन्यात अनंकाने मुंबई येथे झालेल्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेत सहभागी होऊन 2 किलोमीटर मध्ये उत्तम कामगिरी केली. याआधी अनंकाने कोणत्याच स्पर्धेत सहभागी झाली नव्हती.कधी समुद्रात उतरली नव्हती. तिने ठरवले आपण समुद्रात एलिफंटा ते गेटवे ऑफ इंडिया हे 12किलोमीटर पोहून पार करायचे.त्यासाठी अनंकाच्या वडिलांना विचारून अनंकाची दररोज 5 ते 6 किलोमीटर प्रॅक्टीस सुरू केली.समुद्रात पोहण्यासाठी परवानग्या घ्याव्या लागतात. तारीख व वेळ काढावी लागते.ते सगळ झालं. प्रॅक्टीस चालू केली.यश जिमखाना प्रशिक्षक विलास माने,रवि, मॅनेजर मनोज, पतंगे मॅडम आणि स्टाफ यांच्याकडून अनंकाला मोलाचं मार्गदर्शन मिळाले.
तारीख 24फेब्रुवारी रोजी शुक्रवार पहाटे 3.45 ला समुद्राची पूजा करून अंगाला ग्रीस लावून 3.57 ला एलिफंटा येथे अथांग पसरलेल्या समुद्रात पोहण्यास सुरुवात केली.पहाटेच्या वेळेस अंगाला बोचरी थंडी लागत होती.रात्रीच्या वेळी पाण्यात छोटे छोटे मासे हातापायाला टोचत होते.थोडी भीती मनामध्ये होती.कधी समुद्रात रात्रीची सवय नव्हती.पण मनमधून भीती काढून टाकली होती.समुद्रात रात्री मोठमोठ्या बोटी यायच्या.त्यांच्या येण्या जाण्याने मोठ्या लाटा उसळत.कधी कधी माझ्या गॉगल मध्ये पाणी जायचे. ते पाणी काढून नीट गॉगल लावून पोहण चालू ठेवलं.आणि समुद्रातील वाढत्या प्रदूषणामुळे त्रास व्हायचा.गेटवे पासून 2 किलोमीटरवर पाण्यावर तेलाचा तवंग होता.ते पाणी तोंडात गेल्यावर उलटी सारखं वाटायचं.पण मी स्विमिंग चालूच ठेवलं. महाराष्ट्र राज्य हौसी जलतरण संघटनेचे निरीक्षक नील लबदे सर स्टोपवॉच घेऊन निरीक्षण करत होते. अनंकाला प्रोत्साहन देण्यासाठी पाण्यात अहान, साईश,अल्पा,डेलीना, होते. अनंका सर्व संकटांचा सामना करत गेटवे ऑफ इंडिया येथे सकाळी 7.38ला पोहचली. 3 तास 41 मिनिटात 12 किमी.पोहून पार केले.