दिवा दातीवली फाटकाजवळ अखेर डांबरीकरण पूर्ण

 


दिवा, / आरती मुळीक परब:   दिवा दातीवली गाव रेल्वे क्रॉसिंग फाटकातील खड्डे बुजवून अखेर डांबरीकरण पूर्ण झाले.

दिव्यात येणारे दातिवली रेल्वे क्रॉसिंग फाटकात काही दिवसा पूर्वी रेल्वेच्या कामानिमित्त खोदकाम करण्यात आले होते. त्यामुळे वाहनचालकांना फाटकातून प्रवास करताना नाहक त्रास सहन करावा लागत होता. त्या फाटकातून जाताना चार चाकी वाहन वा टू व्हीलर गाडीही अडकून पडत होती. यावेळी अन्य नागरिकांना घेऊन वाहनाला धक्का मारूनच फाटकातून बाहेर काढावे लागत होते. हा रोजचा होणारा मनस्ताप काही वाहनचालक व  ग्रामस्थांनी शिवसेना- उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला उपशहर प्रमुख योगिता नाईक यांच्याकडे सांगितला. 

या समस्यांचे निवारण करण्यासाठी योगिता नाईक यांनी माजी आ. सुभाष भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली 30 जानेवारी रोजी मंडळ रेल प्रबंधक (DRM) रजनीश कुमार गोयल यांची मुंबईत भेट घेऊन त्यांना पक्षाच्या वतीने निवेदन दिले. त्यावेळी त्यांनी DRM यांना लवकरात लवकर दातीवली रेल्वे फाटक येथे तातडीने डांबरीकरण करण्याची विनंती केली. त्यानुसार 10 ते 15 दिवसात डांबरीकरण करू असे सांगितले. त्यानंतर पुन्हा दोन दिवसापूर्वी डांबरीकरणा साठी पाठपुरावा करण्यात आला होता व त्याची रेल्वेने दखल घेत  दतिवली येथे डांबरीकरण करण्यात आले. त्याबद्दल मंडल रेल प्रबंधक रजनीश कुमार गोयल साहेब यांचे शिवसेना- उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला उपशहर प्रमुख सौ. योगिता नाईक मनःपूर्वक आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post