डोंबिवली / शंकर जाधव : महाशिवरात्र उत्सवानिमित्त मानपाडा येथील माणगाव येथील मानपाडेस्वर मंदिरात भक्तांची गर्दी झाली होती.
महाशिवरात्री उत्सवाला एक वेगळं महत्व आहे. या मंदिरातून पंचक्रोशीतील गावांचा सामाजिक न्याय निवाड्यासाठी बैठका होत असतात. मुख्य म्हणजे 27 गांव सर्व पक्षीय हक्क संरक्षण समिती याच मंदिरातून आपल्या कार्यक्रमाची रूपरेषा ठरवीत असते. सामाजिक समस्या सोडविणे, भूमिपुत्रांच्या समस्या, संत सावळाराम महाराज स्मृतीस्थळ आदी विषयासंबंधी चर्चा येथेच होतात यामध्ये पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ सहभागी होतात. या उत्सवानिमित्त भजन, कीर्तन आयोजन केले होते. आगरी समाजाचे जेष्ठ नेते जगन्नाथ पाटील यांनी महादेवाची यथासांग पूजन करून दर्शन घेतले यावेळी गुलाब वझे, दत्ता वझे, पांडुरंग वझे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
Tags
महाराष्ट्र