महाशिवरात्रीचा पॉज अनोखा उपक्रम
डोंबिवली / शंकर जाधव : पॉज ह्या डोंबिवली स्थित संस्थेतर्फे दर वर्षी महाशिवरात्री ला शंकरांच्या पिंडीवर टाकले जाणारे दूध गोळा केले जाते. भाविक लिटर च्या लिटर दुध हे पिंडीवर अभिषेकासाठी घेऊन येतात ते सर्व दूध शेवटी नाल्यात सोडले जाते. असे दूध वाया न जाऊ देता ते सर्व दुध गोळा करून, उकळून, पाणी मिक्स करून, आणि फिल्टर करून पॉज संस्था रस्त्यावरील जखमी प्राण्यांना देते, तसेच न फोडलेल्या दुधाच्या पिशव्या हे वृद्धाश्रम आणि अनाथालय ना दिले जाते.या वर्षी सुध्दा पॉज संस्थेच्या कार्यकर्ते साधना सभरवाल, कौस्तव भट्टाचारजी ह्यांनी सकाळी भविकांशी संवाद साधून त्यांना विनंती करून दूध चमचा भर अर्पण करून बाकीचे संस्थेला दयायला सांगितले, ह्या अभिनव आणि अनोख्या उपक्रमास नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला, अवघ्या काही तासात सुमारे 30 लिटर दुध जमा झाले. डोंबिवली शहरात (paws) प्लॅन्ट अँड एनिमल वेल्फेअर सोसायटी संस्थेच्या वतीने महाशिवरात्रीत जे शिवभक्त शंकराच्या पिंडीवर दूध ओतून दर्शन घेतात ते दुध वाया जाऊ नये
याकरिता या संस्थे मार्फत गेले आठ वर्षांपासून डोंबिवलीत पूर्व व पश्चिम येथील शिव मंदिरात जाऊन दूध जमा करतात ते फिल्टर करून वृद्धाश्रम, अनाथालय मधील मुलांना आणि
रस्त्यावरील भटके कुत्रे, मांजरे याना दूध दिल जात आहे. हा उपक्रम संस्थेचे अध्यक्ष निलेश भणगे व त्यांच्या टीमने गेली सहा वर्षांपासून सुरू केला आहे यामुळे ह्या कार्याच सर्वत्र स्वागत होत आहे. हे आठवे वर्ष असून ह्या वर्षी ही पॉज च्या साधना सभरवाल ह्यांनी हा उपक्रम चालू ठेवला आहे.ह्या वर्षी विविध रोटरॅक्ट क्लब नि व्हाइट रिव्हॉलुशन म्हणून हा उपक्रम चालवला आहे.आर के वृद्धाश्रम ज्यांना पॉज दरवर्षी दूध देते ह्या वर्षी सुद्धा दूध दिले आहे.
आता भाविकांमध्ये बरिच जागरूकता आल्याने ह्या वर्षी त्यांनि दूध वाया न घालवता पाणी अर्पण करण्यास सुरुवात केली आहे, खऱ्या अर्थाने आता व्हाईट रिव्हॉलुशन ला सुरुवात झाली आहे असे निलेश भणगे ह्यांनी म्हटले आहे.