अंबरनाथ शिव मंदिराचा कायापालट होणार

 


१३८.२१ कोटी रुपयांच्या निधीची मंजुरी

अंबरनाथ : येथील एक हजार वर्षाच्या प्राचीन संस्कृतीचा वारसा असलेल्या शिवमंदिर परिसराच्या विकासासाठी राज्य शासनाकडून नुकतीच १३८.२१ कोटी रुपयांच्या निधीची मंजुरी देण्यात आली आहे. यासंदर्भात माहिती देण्यासाठी गुरुवारी अंबरनाथमध्ये पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.

नुकत्याच साजऱ्या झालेल्या महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारने याबाबतचा शासन निर्णय जाहीर केला. या प्रकल्पात शिवमंदिर परिसराचा विकास होऊन त्याचे एका पर्यटनस्थळात रूपांतर होणार आहे. या शिवमंदिरात उपस्थित राहून भगवान भोलेनाथाचे दर्शन घेतले तसेच मंदिर परिसराची पाहणी केली.

९६३ वर्षापूर्वीचे प्राचीन शिवमंदिर ही मध्यवर्ती संकल्पना निश्चित करून परिसरामध्ये या प्राचीन शिल्पाच्या धर्तीवर कामे केली जाणार आहेत. सुशोभीकरण संपूर्ण काळ्या पाषाणात केले जाणार आहे. काशी विश्वेश्वराच्या मंदिराचा कायापालट झाला त्याच धर्तीवर या शिवमंदिराचा विकास केला जाणार आहे. गेल्या तीन वर्षाच्या कालावधीत अंबरनाथच्या विकासकांमासाठी ८१२.७७ कोटी रुपयांचा निधी मिळाला असून यातून अनेक विकासकामे मार्गी लागली असल्याचे यावेळी सांगितले.

मंदिर परिसरात भव्य प्रवेशद्वार, प्रवेशद्वारासमोरील चौकात नंदी, वाहनतळ आणि प्रदर्शन केंद्र, ऍम्फी थिएटर, संरक्षक भिंत, मुख्य रस्ता व अंतर्गत रस्ते, क्रिडांगण आणि स्वच्छतागृह, चेक डॅम, भक्त निवास, घाट आणि संरक्षक भिंत आजी सुविधा असणार आहेत.



Post a Comment

Previous Post Next Post