मुलगा गजाआड
डोंबिवली / शंकर जाधव : वडिलांच्या आजारपणाला कंडाळून मुलाने डोक्यात जात टाकून हत्या केल्याची घटना बुधवारी डोंबिवली पूर्वेकडील भोईरवाडी जवळील चाळीत घडली. हत्या करून मुलगा टिळकनगर पोलीस ठाण्यात हजर झाला. या प्रकरणी पोलिसांनी मुलाला अटक करून गजाआड केले.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तेजस श्यामसुंदर शिंदे (२१) असे अटक केलेल्या मुलाचे नाव आहे. तेजसचे वडील आजारी असल्याने खूप किरकिर करायचे. वडिलांच्या आजाराचा वैताग आल्याने कंटाळेल्या तेजसने बुधवारी सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास घरात वडिलांच्या डोक्यात जात टाकून हत्या केली.